You are currently viewing पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या प्रयत्नातून दाणोली गाव शाळेची छप्पर दुरुस्ती

पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या प्रयत्नातून दाणोली गाव शाळेची छप्पर दुरुस्ती

सावंतवाडी
दाणोली गावातील पूर्ण प्राथमिक शाळेचे छप्पर दोन वर्षापूर्वी नादुरुस्त झाल्यामुळे इमारत धोकादायक बनली होती. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करून देखील कुठलीही हालचाल न झाल्याने पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्याकडे कैफियत मांडली. संदीप गावडे यांनी याबाबत जिल्हा परिषद कडे वारंवार पाठपुरावा करून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या स्वनिधीतून तीन लाख रुपये व स्वतःच्या स्वनिधीतून एक लाख पन्नास हजार रुपये शाळा दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून दिला निधी उपलब्ध झाल्यानंतर ही याबाबतीत प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबल्याने ग्रामस्थांसह संदीप गावडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याशी संवाद साधत सदर त्रुटी दूर करून या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. याचा उद्घाटन सोहळा काल दाणोली गावात झाला. संदिप गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या गावाने मला खूप काही दिले, त्यामुळे माझे कर्तव्य म्हणून मी काम केले, तुम्ही सर्वांनी साथ दिल्यावर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते .यावेळी व्यासपीठावर संदीप गावडे काशिराम सावंत, भाऊराव सावंत, आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य मान. किसन सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर सावंत, प्रभाकर सावंत,लक्ष्मण सावंत,सायली सावंत, चंदू लटम, भास्कर सावंत, दत्तराज गावडे, सौरभ गावडे, अशोक सावंत, मुख्याध्यापक गोठास्कर मॅडम ,ठेकेदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 14 =