You are currently viewing शिवारात दिनराती चल वेचू सखे मोती

शिवारात दिनराती चल वेचू सखे मोती

*गुलदस्ता, शब्दमिलन आदी समूह सदस्या, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील साहित्यिका लेखिका कवयित्री प्रज्ञा तगलपल्लेवार यांची अप्रतिम काव्यरचना*

शिवारात दिनराती चल वेचू सखे मोती
चिंब भिजलया रान अन् दवात गं पाती

आला कणसाला दाना बघ टपोरा टपोरा
तुझ्या माझ्या प्रितीचा बघ दावतोया तोरा

काळ्याआईच्या कुशीत बघ अंकुरले बीज
तुझ्या माझ्या स्वप्नांनी कसा पांघरला साज

कोकिळेची कुहूकुहू कशी गाते या सुरात
गाय हंबरते कशी तिचा जीव वासरात

दुःख झेलूनिया सारे दुःख पेलूनिया जाऊ
संगे सार जीवनाचे जरा उकलून घेऊ !

प्रज्ञा तगलपल्लेवार
मु.पो.पुसद ,जि.यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा