You are currently viewing वन्यप्राणी नुकसानीवर कुडाळात उद्या चर्चासत्र

वन्यप्राणी नुकसानीवर कुडाळात उद्या चर्चासत्र

कुडाळ :

वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, समस्या व त्यांचे निराकरण या विषयावरील कुडाळ तालुकास्तरीय चर्चासत्र कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय राणे व वनशास्त्र अभ्यासक श्री. मिलिंद पाटील (पिंगुळी, ता. कुडाळ) यांच्या प्रमुख (तांत्रिक मार्गदर्शन सादरीकरणासह) उपस्थितीत व फलोत्पादन महाविद्यालय, मुळदेचे प्राचार्य डॉ. हळदोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ४) जूनला सकाळी ९-३० वाजता फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित केले आहे. कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व वन्य प्राण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र होणार आहे. या महत्त्वपूर्ण चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहन निवृत्त कृषी अधिकारी श्रीधर गोरे यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =