देशातील खासगी क्षेत्रातील मुख्य तीन दूरसंचार कंपन्यांकडून चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत शुल्क दरात पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. देशातील रेटिंग एजन्सी क्रिसिलने सादर केलेल्या एका अहवालामधून ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये या कंपन्यांचे उत्पन्न हे २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत.
उद्योगासाठी नेटवर्क विस्तारासाठी आणि स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयोगकर्त्याकडून महसूल अधिकचा मिळण्याची गरज आहे, जर असे नाही झाले तर सेवेची गुणवत्ता खराब होण्याची अधिक शक्यता राहणार असल्याचे रेटिंग एजन्सी क्रिसिल यांनी स्पष्ट केले आहे.
रिलायन्स जिओ आल्यानंतर दूरसंचार कंपन्यांमध्ये वेगवान स्पर्धा निर्माण झाली होती त्यानंतर या उद्योगाने डिसेंबर २०१९ पासून शुल्क दरात वाढ केली होती. मुख्य तीन दूरसंचार कंपन्यांच्या महसुलात चालू आर्थिक वर्षाच्या दरम्यान २० ते २५ टक्क्यांची मजबूत वृद्धी होण्याची शक्यता सांगितली जात आहे.