You are currently viewing ५ जूनला १६ वर्षे खालील मुला-मुलींसाठी ओरोस येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

५ जूनला १६ वर्षे खालील मुला-मुलींसाठी ओरोस येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

ओरोस :

एक दिवसीय जिल्हास्तरीय १६ वर्षे मुलां मुलींसाठी बुद्धिबळ स्पर्धा ५ जून २०२२ रविवारी रोजी श्री गोविंद कार्यालय ओरोस फाटा येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चेस सर्कल यांच्या मान्यतेने श्री चेस अकादमी कणकवली आणि सुयोग चेस अकादमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

इच्छुक स्पर्धकांनी ९४२२३८१९४९, ९४२०२६०७४४, ९४०४३९६२१६ या नंबर वर ४ जून पर्यंत एसएमएस करून नाव नोंदणी करा, असे आवाहन आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १००० रुपये, द्वितीय विजेत्यास ७५० रुपये, तर तृत्तीय विजेत्यास ५०० रुपये आणि तीन्ही स्पर्धकांना चषक तसेच ४ ते १० असे विजेते काढले जाणार असून त्यांना बक्षिसे व मेडल देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =