— शैलेंद्रजी दळवी , संघटनमंत्री , रत्नागिरी – सिंधुदुर्ग .*
मोदी सरकारने सत्तेवर आल्या – आल्या विवीध कल्याणकारी योजनांचा झपाट्याने प्रारंभ केला . या योजना प्रामुख्याने गोर – गरीब , महिला, मध्यम वर्ग , छोटे शेतकरी , कामगार , मजुर , कष्टकरी या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या .या योजनांचे लाभ थेट गरजु वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने थेट हस्तांतरण ( डीबीटी )प्रक्रिया पद्धतशीरपणे कार्यान्वयीत केली . त्यामुळे थेट लाभाच्या योजनेचा पैसा गोरगरिबांच्या खात्यात जमा झाला . अशा योजनांचा जास्तीत जास्त फायदा शेतकरयांना मिळण्यासाठी ” *शिवार बैठकांच्या* ” माध्यमातून किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे , असे आवाहन भाजपाचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी यांनी केले .
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून या आठ वर्षांत देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या , म्हणूनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन किसान मोर्चा च्या वतीने करण्यात आले . व या बैठकांचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावामध्ये आंबाबागेत शेतकरयांच्या उपस्थितीत करण्यात आला .
यावेळी शेतकरयांना शेतकरी सन्मान नीधी , पिक विमा योजना , किसान क्रेडिट कार्ड , किसान रेल , शेतकरी उत्पादक संघटना ( एफ.पी.ओ.) , मृदा आरोग्य कार्ड ,सौर सुजला , ग्राम सिंचाई , ई – नाम , किसान सुविधा अॅप इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली .
*पंतप्रधानांचा अभिनंदनाचा ठराव* ——— मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सिमला येथे आयोजित ” गरीब कल्याण संमेलनाच्या ” व्यासपीठावरुन देशातील १०.५० कोटी शेतकरयांना मोठी भेट दिली . मंगळवारी शेतकरयांना शुभेच्छा देताना त्यांनी पी.एम.किसान सन्मान निधीचा ११ वा हप्ता जारी केला. या अंतर्गत शेतकरयांच्या बॅंक खात्यात २१ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले .याबद्दल किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव शिवार बैठकीत घेण्यात आला .
यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकारी यांचे कौतुक करुन पी.एम.किसान सन्मान योजना जास्तीत जास्त शेतकरयांपर्यंत पोहचवीणयाचे आवाहन केले . यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते किसान मोर्चाचे जिल्ह्याचे संयोजक उमेश सावंत यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई , किसान मोर्चाचे सल्लागार रामकृष्ण उर्फ बाळा सावंत , सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळु प्रभु , महिला जिल्हा संयोजीका दिपा काळे , जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ केळुसकर , जिल्हा चिटनीस अजय सावंत , मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग , ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक , वेंगुर्ले ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , ता.का.का.सदस्य सुनील घाग , प्रगतशील शेतकरी प्रकाश झेंडे , शेतकरी मित्र महादेव नाईक , पोल्ट्री व्यवसायीक सत्यवान पालव , महेश मेस्त्री , महेश सावंत , शैलेश जामदार , सौरभ नाईक , मानसी मेस्त्री इत्यादी कीसान मोर्चा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .