You are currently viewing हुपरीत ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रातर्फे मिडीया संमेलन

हुपरीत ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रातर्फे मिडीया संमेलन

कोमल भाई यांचे पञकारांना मौलिक मार्गदर्शन

इचलकरंजी / प्रतिनिधी

हुपरी येथे ब्रम्हाकुमारी सेवा केंद्राच्यावतीने बदलती पत्रकारिता, आव्हाने आणि समाधान या विषयावर मिडीया संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध ठिकाणच्या पञकारांनी सहभाग नोंदवत पञकारिता क्षेञातील बदलते वातावरण ,आव्हाने व शाश्वत समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.तर ब्रम्हाकुमारी माऊंटआबु सेवा केंद्राचे जनसंपर्क अधिकारी कोमल भाई यांनी नितीमुल्यांची जपणूक करत सकारात्मक पञकारिता याविषयी अभ्यासपूर्ण मौलिक केले.

काळानुसार पञकारिता क्षेत्र बदलत चालल्याने पञकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यात व्यवस्थापनाची बदलती धोरणे , व्यावसायिकता यातून पञकारांवरील ताण तणाव वाढत राहून त्यांचे स्वास्थ्यच हरवत चालले आहे.त्याचबरोबर नितीमुल्यांचा -हास होत व्यसनाधीनता त्याचबरोबर गैरप्रकार देखील वाढू लागले आहेत.अशा आव्हानात्मक परिस्थितीत पञकारांमध्ये समाजाप्रती कर्तव्याची भावना वाढत राहून शाश्वत समाज परिवर्तनाची चळवळ अधिक गतीमान व्हावी ,नितीमुल्यांची जोपासना होवून निर्भिड,नि:पक्ष पञकारिता कार्यरत व्हावी ,याच उद्देशाने ब्रम्हाकुमारी सेवा ंंकेंद्र व केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंञालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णीम भारताकडे या उपक्रमांतर्गत
हुपरी येथे ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रामध्ये बदलती पत्रकारिता, आव्हाने आणि समाधान या विषयावर मिडीया संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध ठिकाणच्या पञकारांनी सहभाग नोंदवत पञकारिता क्षेञातील बदलते वातावरण ,आव्हाने व शाश्वत समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी ब्रम्हाकुमारी माऊंटआबु सेवाकेंद्राचे जनसंपर्क अधिकारी कोमल भाई यांनी
बदलत्या काळानुसार पत्रकारीतेसमोरही अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र त्यावर कोणी उपाययोजना सांगताना दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणा, सदभाव, प्रेमभाव आणि संघटन वाढवणे गरजेचे आहे.तरच
स्वत:बरोबरच समाज परिवर्तन घडू शकते, आत्मीक समाधान मिळते आणि मन संतुलित ठेवण्यास मदत होते, असे मौलिक मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ,
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने संमेलनाला प्रारंभ झाला. संमेलन आयोजनाचा उद्देश विशद करून हुपरी ब्रम्हाकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका
ब्रम्हाकुमारी सुनितादिदी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. तसेच ब्रम्हाकुमारी सेवा केंद्राच्या
पुणे क्षेञीय संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनंदा बहनजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार दगडू माने ,रामचंद्र ठिकणे ,
एन.एस. पाटील यांनी पञकारिता क्षेञातील बदलत्या घडामोडींचा उहापोह मांडून पञकार बंधूंनी स्वतःचा
स्वाभिमान जपत निर्भिड व नि:पक्ष पञकारिता करत शाश्वत समाज परिवर्तनासाठी कार्यरत रहावे , असे आवाहन केले.यावेळी
पत्रकार बाळासाहेब कांबळे, मुबारक शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पञकार संजय कुडाळकर यांच्यासह प्रमुख पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या संमेलनासाठी हातकणंगले, शिरोळ व कागल तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा