You are currently viewing भात विक्रीवरील बोनस रक्कम एक हजार प्रमाणे  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

भात विक्रीवरील बोनस रक्कम एक हजार प्रमाणे  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

आमदार नितेश राणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाकडे भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी बोनसची रक्कम अद्याप मिळालेली नाही.यावर्षीची भात खरेदीची बोनस रक्कम प्रति क्विंटल एक हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करणारे पत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

या पत्रात आमदार नितेश राणे म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड करून भाताचे उत्पन्न घेत असतो. दरवर्षी एकूण पिकवलेल्या भात पिकाची तालुका स्तरावरील खरेदी विक्री केंद्रावर केंद्र सरकारच्या हमी भावानुसार सरकार खरेदी करीत असते . त्याचप्रमाणे राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात दरवर्षी रक्कम देण्यात येते . यावर्षी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार प्रति क्विंटल १९४० रूपये याप्रमाणे भात खरेदी करण्यात आली आहे . गतवर्षी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७०० रूपये क्विंटल याप्रमाणे बोनस रक्कम अदा करण्यात आलेली होती .परंतु यंदा शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस म्हणून देण्यात येणारी रक्कम अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे . शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे भासविणाऱ्या राज्य सरकारकडून भात शेतीच्या नविन हंगामाची सुरूवात झाली , तरी अजून पर्यंत आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयश आलेले आहे .तरी यावर्षीचे भात खरेदीचे रूपये १००० क्विंटल याप्रमाणे बोनस रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी .

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 4 =