राष्ट्रवादी उप जिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांची जि. प. सीईओ यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग
देवगड तालुका उमेद अभियाना अंतर्गत पोंभुर्ले प्रभाग समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या अभिजित भगवान चव्हाण हे शासनाचा पगार घेऊन स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्याची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली आहे
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजित भगवान चव्हाण हे प्रभाग समन्वयक म्हणून पोंभुर्ले व अतिरीक्त शिरगाव प्रभागात कार्यरत आहेत. गेली चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात स्वत:च्या व्यवसायाचा चांगली भरारी घेतली आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन -२०१६ पासून सिंधुदुर्गगात सुरुवात झाली.सदर अभियानामध्ये महिला सक्षमीकरण व महिलाना गरीबीतून मुक्त होऊन सन्मानाचे जीवन जगले पाहिजे व स्वत:चे छोटे मोठे व्यवसाय उभारून त्यातून किमान १.लाख पर्यंत चे उत्पन्न वाढविले पाहिजे असे उमेद अभियांनातून बोध जातो किंवा मूळ उद्येश आहे.कुंपणच शेत खात आहे या म्हणी प्रमाणे श्री अभिजित चव्हाण हे स्वत:चा व्यवसाय मात्र गेली तीन चार वर्षापासून सुरु आहे. आंबा विक्री व्यवसाय ,अगरबत्ती विकणे ,कांदा विकणे ,काजू विकणे,इतर अनेक व्यवसाय ते करत आहेत. परंतु महिलाना व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांना गरीबीतून मुक्त करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे याचा त्यांना विसर पडला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हामध्ये किमान ९००० ते १०००० बचत गट कार्यरत आहेत.परंतु अभिजित चव्हाण सारखे लोक जर अभियानाचाच पगार घेऊन स्वत: चे हेतू साध्य करत असतील तर अजून १०० वर्ष गेलेतरी महिला सक्षमीकरण होणार नाही .महाराष्ट्र नागरी सेवा नियम सन -१९७९ प्रमाणे एखादी व्यक्ती नोकरीवर असताना तो व्यवसाय करू शकत नाही.भले तो कंत्राटी असो किंवा नियमित कर्मचारी असो.असे असताना आपल्या विभागाकडून पूर्ण पणे दुर्लक्ष होतआहे असे दिसून येत आहे.तसेच MCL प्रकल्पात बोर्ड ऑफ डारेक्टर व प्रोमोटरस या यादी मध्ये देखील त्याचं नाव आहे.
श्री अभिजित भगवान चव्हाण यांची सखोल चौकशी होऊन त्यांचे बँक खाते पुस्तक तपासून त्यांचेवर प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करावी.अन्यथा या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद घ्यावी. त्यांचा हा व्यवसाय राजेरोष पणे काही वर्षा पासून सुरु आहे.गरीब महिलांची पसवणूक होऊनये हीच आमची मापक अपेक्षा. असे पिळणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली आहे. लवकरच आपण या दोन्ही मंत्र्यांची भेट घेऊन संबंधित अधिकार्याचे कारणामे पुराव्यासहित त्यांच्या समोर सादर करणार असल्याचे पिळणकर यांनी म्हटले आहे.