You are currently viewing विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या यंत्रणांच्या गैरवापराबाबत..

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या यंत्रणांच्या गैरवापराबाबत..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना निवेदन सादर

ओरोस

लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार खटला ठेवला गेला. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे.

साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकारं पाडण्याचे असत्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सद्याच्या सरकारची ओळख झाली आहे.

विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. हेच चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रातही दिसू शकेल. विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधांनकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी अशी विनंती निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना करण्यात आली आहे.

यावेळी प्रांतीक सदस्य तथा जेष्ठ नेते नंदू शेठ घाटे, कोकण विभागीय महिलाध्यक्षा सौ अर्चना घारे,उपाध्यक्ष अनंत पिळणकर संघटक सचिव काका कुडाळकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नझीर भाई शेख,जिल्हा चिटणीस रूपेश जाधव डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल,कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवा पिळणकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर,व्यापार उद्योग सेल कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान,दर्शना बाबर देसाई, शरद शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =