You are currently viewing शिक्षण प्रसारक, कोकण सुपुत्र श्री. सत्यवान रेडकर यांची शासकीय व्याख्यानाकडे वाटचाल…

शिक्षण प्रसारक, कोकण सुपुत्र श्री. सत्यवान रेडकर यांची शासकीय व्याख्यानाकडे वाटचाल…

 

तिमिरातुनी तेजाकडे ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक यांची शतकीय व्याख्यानाकडे वाटचाल सुरू झाली आहे. तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा उद्देश्य विविध प्रशासकीय पदांवर आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी दिसावेत यासाठी विविध ठिकाणी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता, आवड निर्माण करून त्यांना विविध माध्यमांद्वारे संपर्कात ठेवून मार्गदर्शन प्रदान करणे होय. व्याख्यानासाठी रेडकर सर कोणतेही मानधन व प्रवास भत्ता घेत नाहीत. मातीशी असलेली ओढ जोपासत निरंतर असलेली व्याख्यानमाला लवकरच शंभरी गाठत आहे. कर्मचारी चयन आयोगातर्फे २०१७ च्या JHT परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १६६ व्या क्रमांकावर त्यांची निवड होऊन मुंबई सीमाशुल्क विभागात कार्यरत असलेले कोकणचे सुपुत्र, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क यांच्या आगामी व्याख्यानांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः

१) रविवार, दिनांक ५ जून २०२२, सकाळी ९.०० वाजता, भोईराज भवन, समाज सभागृह, दिवा (पू), ठाणे (व्याख्यान क्र. ९६)

२) रविवार, दिनांक १२ जून २०२२, दुपारी २.०० वाजता, एल.एम.पटेल सभागृह, उचाट, ता.वाडा, जि. पालघर (व्याख्यान क्र. ९७)

३) शनिवार, दिनांक १८ जून २०२२, सकाळी ८.०० आणि दुपारी १.०० वाजता, रा.ज.ठाकूर बँक्वेट हॉल, सावरकर नगर, ठाणे (व्याख्यान क्र. ९८ तसेच ९९)

४) रविवार, दिनांक १९ जून २०२२, सकाळी ८.०० वाजता, बालक मंदिर संस्था कल्याण, गिरगाव माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, गिरगाव, ता. तलासरी, जि. पालघर (व्याख्यान क्र. १००)

विद्यार्थी व पालकवर्गाने जास्तीत जास्त या निशुल्क व्याख्यानांचा लाभ घ्यावा व काहीही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास 9969657820 या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा