आम. वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून संगणक प्रदान
ओरोस :
ओरोस येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयासाठी आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून एक संगणकसंच देण्यात आला आहे. आज आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संगणक संच प्रदान करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अधीक्षक अरुण भुईंबर, निरीक्षक महेश रसाळ व संजय चव्हाण, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.