You are currently viewing प्रिये,मी खरच आहे नशीबवान

प्रिये,मी खरच आहे नशीबवान

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

प्रिये,मी खरच आहे नशीबवान
एकरूप राहे शालीन भाग्यवान।।ध्रु।I

हृदय मंदिरी जपली तव मूर्त
सर्वथा पाठिशी उभी राही झेलत
उत्कर्ष जाहला तव स्फूर्ती प्रेमानं।।1।।

वर्षा ऋतु असो वा नसो वाटे मोद
तव प्रेम वर्षावाने होतो प्रोत्साहित
स्वर्गात गाठ बांधली ईश्वरानं।।2।।

सुखदुःखात केलीस साथसंगत
संसार बहरला सांभाळलेस ब्रीद
जिंकले सर्व हातात हात घालून।।3।।

काव्य:श्री अरुण गांगल,कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन – 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 8 =