You are currently viewing जैतिर उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

जैतिर उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

वेंगुर्ला

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला-तुळस येथील ‘नराचा नारायण‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतिर उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या आज पहिल्या दिवशी हजारो भाविकांच्या श्री देव जैतिराचे दर्शन घेतले.

गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे हा उत्सव अगदी मर्यादित स्वरुपात पार पाडला होता. यावर्षी कोरोना संकट नसल्याने या उत्सवाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराची रंगरंगोटी सुरु होती. त्यानंतर लांबलांबच्या दुकानदारांनी आधीच दोन ते चार दिवस दुकानांसाठीची आपली जागा निश्चित केली होती. त्यामुळे उत्सवापूर्वीच मंदिर परिसरात जत्रेचे स्वरुप निर्माण झाले होते.

आज सोमवारी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत नारळ, केळी, तुरे आदी वस्तू देवाला भक्तिभावाने अर्पण केल्या. दुपारनंतर मुख्य कार्यक्रमाला तर भाविकांनी प्रचंड गर्दी करीत उत्सवाचा आनंद लुटला. मंदिर परिसरात विविद्य खाद्य पदार्थ, जीवनोपयोगी वस्तू, हौशेच्या वस्तूसह शेतीसाठी लागणा-या अवजारेही विक्रीस आली होती. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी बाजारपेठेत खरेदीही केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा