You are currently viewing प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके विदर्भाध्यक्ष पदी..!

प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके विदर्भाध्यक्ष पदी..!

*प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके विदर्भाध्यक्ष पदी..!*

*उज्जैनकर फाऊंडेशन मराठी प्रसारासाठी अग्रणी..*

(मुक्ताईनगर)

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर या साहित्यिक व समाजसेवी फाउंडेशनच्या विदर्भ अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम यांची दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी ऑनलाइन सभेमध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवशरण उज्जैनकर, फाउंडेशनचे राज्याध्यक्ष प्राचार्य डॉ. सतीश तराळ ,डॉ सुभाष बागल राज्य सचिव,केंद्रीय व राज्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी इत्यादी मान्यवर सभेला उपस्थित होते. राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी विदर्भ प्रदेश कार्यकारिणी घोषित केली . यामध्ये विदर्भ अध्यक्ष म्हणून हिवरा आश्रम येथील साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंढरीनाथ शेळके यांची निवड केली.
विदर्भ कार्यकारणी मध्ये प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके अध्यक्ष, प्राचार्य डॉ. लताताई थोरात अकोला उपाध्यक्ष, प्रा. गजानन घोंगटे वाशिम सचिव, प्राचार्य अनिल प्रांजळे अमरावती संपर्कप्रमुख, सौ सविता डिगांबर बोरकर वाशिम संघटक, प्राध्यापक अरुण बुंदिले अमरावती प्रसिद्धीप्रमुख, व श्री किशोर वसंतराव कणखर चिखली सल्लागार, असे सात पदाधिकारी विदर्भ प्रदेश कार्यकारणीसाठी निवड करण्यात आले.
प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके अनेक वर्षापासून उज्जैनकर फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हा महासचिव , बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख ही संघटनेची पदे भुसवलेली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरील शिव मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर , गोवा, खामगाव व अमरावती येथे पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. प्राचार्य शेळके हे विविध सामाजिक कार्यामध्ये पुढे आहेत. त्यांच्या सेवा कार्याचा गौरव जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान प्रशस्तीपत्र गौरवचिन्ह देऊन करण्यात आलेला आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातही कार्य सुरू आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उज्जैनकर फाउंडेशनच्या शाखा स्थापन करून मराठी भाषेचे प्रचार संवर्धन आणि जतन करण्यासाठी अहोरात्र कार्य करत राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शेळके सर यांच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवडी बाबत महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा