जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गायिका अरुणा दुद्दलवार यांची अप्रतिम गझल रचना
डोळ्यात भावनांचा झाला कसा इशारा।।
हातात हात घेता हसला कसा किनारा।।
लाटा हळूच आल्या ओल्या मिठीत जेव्हा
रोमांचल्या तनाला भुलला कसा किनारा।।
तनमोर नाचताना धुंदीत फार असतो
फांदीवरी फुलांचा झुलला कसा किनारा।।
वाळूवरी सख्या त्या लाटा सुरेख
आल्या
थेंबात ओवलेला खुलला कसा
किनारा।।
ते शिंपले मनाचे मिटले तसेच आहे
तो शांत राहुनी ही फसला कसा किनारा।।
अरुणा दुद्दलवार🙏✒️