You are currently viewing पुस्तक

पुस्तक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित पुस्तक दिनानिमित्त काव्यरचना*

 

*पुस्तक*

 

ज्याच्या मुळे आम्ही

शिकलो सवरलो

सुशिक्षित सुसंस्कृत

सभ्य समाजात

आमची वर्णी लागली

ते पुस्तक. ..

 

ज्याच्या मुळे आम्ही

वाचायला लिहायला शिकलो

ज्याच्या मुळे आमच्या

ज्ञानात भर पडली

ते पुस्तक….

 

ज्याच्या मुळे

उत्कृष्ट उत्तमोत्तम

साहित्यिक घडले

ते पुस्तक…..

 

ज्यामुळे

वाचनसंस्कृती चा

उगम होऊन

वारसा जोपासला गेला

ते पुस्तक….

 

कथा कादंबरी

काव्य ललित

नाटक अग्रलेख

असे अनेक साहित्य

संग्रह प्रकारांना ओळख

व अबाधित स्थान मिळाले

ते पुस्तक….

 

पौराणिक ऐतिहासिक

आधुनिक सात्विक तात्विक

ज्ञानाचा भांडार कोश

साठवून सांभाळून ठेवते

ते पुस्तक….

 

प्रत्येक माणूस

आत्मियतेने वाचतो

जिवापाड जपतो

आचरण करून

बोध घेतो

ते पुस्तक….

 

तुमच्या आमच्या

सर्वांच्या आवडीचे

जवळ बाळगावे

असावे

ते पुस्तक….

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7488318543.

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा