You are currently viewing २७ जूनला होणार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक 

२७ जूनला होणार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक 

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक २७ जून रोजी होणार आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, खजिनदार सहकार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्य अशी १५ पदासाठी ही निवडणूक असणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील मालवणी गेस्ट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी अशोक करंबेळकर उपस्थित होते. श्री केसरकर पुढे म्हणाले, ५ जूनला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रारूप सभासद यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यानंतर आठ जून पर्यंत हरकती व सूचना सादर करणे, ९ जूनला सभासदांची अंतिम यादी जाहीर करणे,१६ ते २० जूनला नामनिर्देशन पत्र सादर करणे, २२ जूनला सादर झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे, २४ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २४ जूनला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तर २७ जूनला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा असून या सभेत आवश्यक असल्यास मतदान होईल, व मतमोजणीनंतर याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी नवीन पदाधिकारी व कार्यकारणी यांची नावे जाहीर करणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 10 =