जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
मज ठेवता न आली कांही मिळून गेली
ती आठवणी लिहिलेली पाने गळून गेली
फुलला वसंत होता तू बहरात बहरलेली
तुज पाहताच गीताची सम जुळून आली
ते गीत आज माझे ही कोठेच सांपडेना
जी शब्द फुले गंधा सह दरवळून गेली
रुसलीस एकदा तू इतुकेच मला स्मरते
समजूत कशी पटली नाही कळून आली
ते चांदणेच होते कां हंसणे तुझेच गाली
ठाउक त्याच किरणांना जी मावळून गेली
आठवांच्या गलबतांना मी शोधतो किनारी
जी वेगळ्याच वाटेने केंव्हाच वळुन गेली
अरविंद १६/५/२०