You are currently viewing भुईबावडा परिसरात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडण्याचा वीज वितरणला इशारा

भुईबावडा परिसरात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडण्याचा वीज वितरणला इशारा

वैभववाडी

भुईबावडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील नळयोजना मोटारपंप, विद्युत उपकरणे वारंवार नादुरूस्त होत आहे. तसेच वारंवार वीज खंडित होत असल्याने गावातील जनतेची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. तरी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा भुईबावडा ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वीज वितरणला निवेदनाव्दारे दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून भुईबावडा परिसरात वीज पुरवठा खंडित होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. तसेच नळयोजना मोटारपंप नादुरूस्त होत आहेत. तसेच भुईबावडा ग्रामपंचायत हद्दीतील लाईन पोलवर झाड वेलींनी वेटोळे केलेले असल्यामुळे वीज प्रवाह खंडित होत आहे.

तरी विद्युत लाईनवरील झाडी तोडून विद्युत पुरवठा सुरळीत करा. अन्यथा भुईबावडा ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वीज वितरणला निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी निवेदन देताना भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, दिपक पांचाळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 10 =