You are currently viewing कणकवली येथील कोरल अपार्टमेंटतर्फे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सत्कार

कणकवली येथील कोरल अपार्टमेंटतर्फे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सत्कार

कणकवली

फेरफार नोंदणी शुल्क कमी करत कणकवली शहरात नवीन प्लॅट खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणाऱ्या कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांचे गुरुवारी कोरल अपार्टमेंट रहिवाशांतर्फे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी कोरल अपार्टमेंटचे बाळकृष्ण कुडतरकर, अर्जुन बापर्डेकर, उदय करंबेळकर, संतोष गुरसाळे, संदिप ताम्हणकर,प्रशांत राणे, दत्ताराम जाधव,भालचंद्र घाडीगांवकर, दळवी, दत्ता डेगवेकर, विनायक चव्हाण आदी उपस्थित होते.

कणकवली शहरात प्लॅट खरेदी नंतर ४५ दिवसाच्या आत नगरपंचायती मध्ये नोंद न झाल्यास फेरफाराबाबत खरेदी किंमतीच्या ०.७५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती. आकारण्यात येणाऱ्या या अवाजवी दंड रक्कमेमुळे कर्ज काढून घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही बाब त्रासाची ठरली होती. याबाबत कोरल अपार्टमेंट रहिवाशांनी तसेच इतर अपार्टमेंट रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते बंडू गांगण यांच्या माध्यमातून तर स्वतः नगराध्यक्षांची भेट घेत आपल्या व्यथा नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या पर्यंत पोहोचवल्या होत्या.

त्यांच्या भावनांचा विचार करून नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी ठोस निर्णय घेत प्लॅट खरेदीच्या ४५ दिवसांनंतर नगरपंचायतीत फेरफार नोंदणीसाठी केवळ १००० रु एवढेच शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिल्याने नवीन प्लॅट धारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत कोरल अपार्टमेंट सदस्यांनी नगराध्यक्ष समिर नलावडे व रहिवाशांना सहकार्य करणारे बंडू गांगण यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करत आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा