२०१७ सालापासून सुरु झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यंदा सुविख्यात अभिनेते, उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक तसेच कर्करोगावर यशस्वीपणे मात करणारे श्री शरद पोंक्षे जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार सोहळा वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात दि. ११ जून (शनिवार) २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेला असून महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आ.श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. तसेच कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावर श्री शरद पोंक्षे जी यांचे व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे.
या सोहळ्याला जिल्हावासीयांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन स्व. एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्कार समितीचे डाॅ. अमेय देसाई व वेंगुर्ले येथील कार्यक्रमाचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे .