सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी येथए सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सर्व युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व माजी सैनिक अनाथ पाल्य तसेच शिल्लक राहिलेल्या जागांसाठी नागरी पाल्य यांनी दि. 15 जून 2022 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करुन या संधिचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
वसतीगृह प्रवेशासाठी दर सूची पुढीलप्रमाणे आहे. माजी अधिकारी, ऑनररी अधिकारी पाल्य रु. 900 दरमहा, माजी जेसीओज पाल्य रु. 800 दरमहा, माजी एनसीओज/शिपाई – रु. 600 दरमहा, नागरी पाल्य रु. 2 हजार 250 दरमहा. तसेच युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा यांचे सर्व पाल्यांना तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतीगृह प्रवेश मोफत आहे. नागरी पाल्यांसाठीच्या दरात यंदाच्यावर्षी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रवेश पुस्तिका संबंधीत वसतीगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 02363-272312, 9545287331 या क्रमांकावर संपर्क साधावा.