You are currently viewing केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मंगळवारी साधणार संवाद

केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मंगळवारी साधणार संवाद

सिंधुदुर्गनगरी

भारतीय स्‍वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्‍सवानिमित्‍त भारत सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ घेणा-या  लाभार्थ्‍यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशव्‍यापी संवाद मंगळवार  दि. ३१ मे रोजी आयोजित करण्‍यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान श्री. मोदी हे देशातील कोणत्‍याही राज्‍यामधील कोणत्याही जिल्‍ह्यातील योजनेचा लाभ घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्‍याअनुषंगाने जिल्‍ह्यातील केंद्र शासनाच्‍या  विविध योजनांच्या लाभार्थ्यांबाबत संबंधित विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

                भारत सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ घेणा-या  लाभार्थ्‍यांशी  देशव्‍यापी संवाद  संदर्भातील  बैठक आज  जिल्हाधिकारी कार्यालय, येथे घेण्यात आली. बैठकीस मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍तात्रय भडकवाड, उपजिल्‍हाधिकारी रोहयो  अविशकुमार सोनोने, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. श्रीपाद पाटील, अग्रणी  जिल्‍हा व्यवस्थापक प्रदीप प्रामाणिक, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी  महिला व बाल विकास संतोष भोसले,  सावंतवाडी मुख्‍याअधिकारी  जयंत जावडेकर तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

                जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी पुढे म्‍हणाल्‍या, दिनांक ३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  हे केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थांशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना संबंधित यंत्रणा राबवित आहे, त्या यंत्रणांनी आपल्या लाभार्थीबाबत नियोजन करुन तयारी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा