वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयाचा ग्रेड परीक्षेचा निकाल १००%
तळेरे हायस्कूलचा एलिमेंटरी व इंटरमिजिट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%
वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेचा एलमेंटरी – इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १००% लागला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातून एलिमेंटी परीक्षेत ११ तर इंटरमिजिएटसाठी १६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालायाचा निकाल १००% लागला.
विद्यालयातून एलिमेंटरी व इंटमिजिएट परीक्षेसाठी एकूण २७ विद्यार्थीपैकी इंटरमिजिट ग्रेड परीक्षेत रोहित संतोष घाडी हा ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला तर ‘ब’ श्रेणी विघ्नेश विजय तावडे , सार्थ प्रमोद खटावकर , ईशा जयराम सावंत , श्रेया अनंत तळेकर यांनी प्राप्त केली तसेच एलिमेंटरी परीक्षेत आयुष सदानंद सुतार याने ब श्रेणी प्राप्त केली . यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक पी.एन.काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , कार्यकारी मंडळ सर्व सन्माननीय पदाधिकारी , शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , सन्माननीय सर्व सदस्य , मुख्याध्यापक एस.जी.नलगे , ए.एस. मांजरेकर , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक ,विद्यार्थ्यांनीं अभिनंदन केले.