You are currently viewing तोपर्यंत आरटीओची वेग नियंत्रण करणारी मोबाईल व्हॅन रोडवर ठेऊ नये – माजी आम.परशुराम उपरकर

तोपर्यंत आरटीओची वेग नियंत्रण करणारी मोबाईल व्हॅन रोडवर ठेऊ नये – माजी आम.परशुराम उपरकर

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावर ठेकेदाराकडून स्पीड लिमिट (वेग मर्यादा) चे साइन बोर्ड लाऊन रिफ्लेक्टर व आरटीओच्या नियमाप्रमाणे फलक लावण्यात यावेत तसेच जोपर्यंत साईन बोर्ड लावत नाही तोपर्यंत आरटीओची वेग नियंत्रण करणारी मोबाईल व्हॅन रोडवर ठेऊ नये अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी निवासी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

निवेदनात परशुराम उपरकर म्हणतात,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागा अंतर्गत महामार्गावरील अपघात टाळण्याकरीता दर महिन्याला परिवहन कार्यालयातील होणाऱ्या व आपल्या अध्यक्षतेखालील बैठकीत नागरीकांच्या अडचणींचा विषय चर्चेत आणण्याबाबत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ता नव्याने झालेला असल्याने या रस्त्यावरून परराज्यतील तसेच मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी गाडी चालविताना रस्ता सुस्थितीत असल्याने वेग मर्यादा न ठेवता चालवत असतात. अशा वेग मर्यादा न ठेवता गाडींना परिवहन विभागाकडून वेग मर्यादा नियंत्रण ठेवण्याकरीता मोबाईल व्हॅन वेगाने चालवत असलेल्या गाड्यांना 2000, 1200, 500 भुर्दंड आकारलेला भरावा लागतो.

येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचे आरटीओ विभागाच्या गाडीमार्फत शुटींग करून दंडाची नोटीस वेग नियंण ठेवणाऱ्या मोबाईलवर पाठविली जाते. सदर महामार्गावर ठेकेदारांनी कोणत्याही ठिकाणी वेगमर्यादा काय असावी याचेही फलक लावले नसल्याने सर्व गाडी चालक मालक वेग मर्यादा ठेवत नसल्याने वेगाने गाडी चालवत असल्याने त्यांना दंड भरावे लागत आहेत. ठेकेदारांनी त्यांच्या असलेल्या ॲग्रीमेंटमध्ये परीवहन विभागाच्या नियमाप्रमाणे साईन बोर्ड लावणे गरजेचे असल्याने ते लावले नसल्याने या वाहन चालकांना गाडी वेगाने चालवल्याने महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे सामान्य जनतेला दंड भरावे लागत आहे.

याकरीता आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा स्पीड लिमिटचे बोर्ड आरटीओच्या नियमाप्रमाणे असलेले साईन बोर्ड लावण्याची सक्ती करावी व भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी वळणाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व खड्डे भरणे व रस्त्याची दुरूस्ती करणे याकरिता तातडीने बैठक लाऊन या गाडीचालक मालकांवरती होणारा त्रास व मालकांना भरावा लागणारा दंड थांबवण्याकरीता जनतेला कोणत्या ठिकाणी किती वेगमर्यादा असावी ही माहिती कळण्याकरीता दोन्ही बाजुंनी साइन बोर्ड लावण्याकरीता तातडीने बैठक लावण्यात यावी. जोपर्यंत साईन बोर्ड लावत नाही तोपर्यंत आरटीओची वेग नियंत्रण करणारी मोबाईल व्हॅन रोडवर ठेऊ नये अशी मागणी माजी आम.परशुराम उपरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा