आमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध
भाजप खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील,जिल्हा अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी तथा सडुरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व चव्हाणवाडीतील स्थानिक व मुंबई ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश
वैभववाडी
सडुरे शिराळे ग्रामपंचायत हद्दीतील राणेवाडी – चव्हणवाडी रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. आमदार नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून खडीकरण साठी निधी उपलब्ध. भाजप खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील,जिल्हा अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी तथा सडुरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व चव्हाणवाडीतील स्थानिक व मुंबई ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश..
या कामाचा शुभारंभ करतेवेळी बोलत असताना प्रकाश पाटील यांनी आमदार नितेशजी राणे साहेब यांनी चव्हाणवाडी रस्ता खडीकरण साठी निधी उपलब्ध करून देत जनतेला दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले या पुढेही लागेल ते सहकार्य आमदार नितेश राणे देतील व वाडी पर्यंत डांबरीकरण करून देऊ असे आश्वासन जनतेला दिले तसेच जनतेने सहकार्य करावे लागेल त्या ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी असे देखील आवाहन पाटील यांनी केले. तर याआधी या रस्त्याचे कटिंग व तीनशे मीटर खडीकरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून भाजपचे ग्रा. प.सदस्य नवलराज काळे यांनी विशेष प्रयत्न करून शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जनेतेच्या सहकार्याने काम पूर्ण केले होते. या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यांनी जनतेच्या वतीने कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला त्याबद्दल आभार मानले. सडुरे शिराळे गावाचा विकास राणे साहेब यांनीच केले व या पुढे ही राणे साहेब व भाजपच करणार जनता देखील राणे साहेब यांच्या सोबत याधीही ही होती व या पुढे सोबतच राहील असे वचन देत पुन्हा एकदा राणे साहेब भाजप कार्यकारणी,शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील व सहकार्य करणाऱ्या जनतेचे आभार मानले.यावेळी खांबाळे शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा सडुरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,महेश पाटील, सडूरे शिराळे ग्रामपंचायतीचे तंटामुक्त अध्यक्ष दिपक चव्हाण,रवळनाथ विकास सोसायटी चेअरमन संतोष भोसले,शिवाजी चव्हाण ,आत्माराम डांगे, केशव राऊत,प्रकाश दळवी संजय गायकवाड,चंद्रकांत साटम,निळकंठ सावंत,बाबू भोसले,चंद्रकांत भोसले,सार्थक गायकवाड, साईल सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.