You are currently viewing कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचे सिंधुदुर्गात व्याख्यान

कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचे सिंधुदुर्गात व्याख्यान

भारतीय सागरी परंपरा आणि मराठा आरमार या विषयावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचे प्रबोधनपर व्याख्यान २१ मे रोजी कोटकामते येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी छत्रपतींचे आरमार सांभाळले व अरबी समुद्रात आपली दहशत बसवली होती कुलाबा किल्ला व विजयदुर्ग किल्ला ही त्यांची ठाणी होती त्यांची कुलदेवता म्हणजे कोटकामते येथील भगवती देवी यांच्या दर्शनासाठी रघुजीराजे आंग्रे हे देवगड तालुक्यातील कोटकामते येथे येणार आहेत या निमित्ताने त्यांचे व्याख्यानही होणार आहे या व्याख्यानाचे आयोजन देवी भगवती इनामदार संस्थान कोटकामते यांनी केले असून या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा