You are currently viewing कुडाळात उद्या उद्यानाचे भूमिपूजन

कुडाळात उद्या उद्यानाचे भूमिपूजन

भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते..

 

कुडाळ :

 

कुडाळ शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत नगरपंचायत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. उद्यानाचा भूमिपूजन कार्यक्रम येथील नाट्यगृहानजीकच्या जागेत शुक्रवार 20 मे रोजी सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती अशी माहिती नगराध्यक्ष सौ.आफ्रीन करोल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत आ. केसरकर, आ. वैभव नाईक आ. नितेश राणे, आ.अनिकेत तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुडाळ शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायत नगराध्यक्ष यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा