आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी अधिकाऱ्यांसंवेत केली पाहणी
कणकवली
नांदगाव ब्रिज शेजारून जाणारा सर्विस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्या. मागणी नसताना गतिरोधक का घातले.या पुढे चुकीचे गतिरोधक घालू नका.पावसात ज्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे तेथे तातडीने काम करा व मोरी बांधा.पाऊस पडल्यावर कोणाच्या तक्रारी नकोत.अपघात होईल आणि निरपराध लोकांचे जीवजातील अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्या.अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकऱ्याना नांदगाव येथे महामार्गाच्या अर्धवट कामाच्या पाहणी दरम्यान केल्या.
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना अपघाताचे आमंत्रण दिलेले आहे.हा सर्व्हिस रोड कधी पूर्ण करणार त्याचा प्रश्न कसा निकाली काढणार याबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.ज्यांची घरे,जमिनी गेल्यात त्यानचा मोबदला तातडीने देण्यासाठी जलद गतीने काम करा.दोन-चार महिने नोटीस पोचण्यासाठी का वेळ लागतो याचे आत्मपरीक्षण महसूल विभागाने करावे.प्राथमिक शाळेत येणाऱ्या मुलांसाठी महामार्ग कसा ओलांडावा याचे नियोजन करा, पर्याय काय असेल तो द्या,ब्रिज वरील लाईट बंद आहेत ते लावा,गटारे आणि वीज वितरण चे लाईटचे बॉक्स उघडे ठेवले आहेत. ते बंद करा.अशा सूचनाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिल्या.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज नांदगाव येथे भेट देऊन महामार्ग चौपदरीकरण कामाच्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.या संदर्भात काल कणकवली प्रांत कार्यालय येथे अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नांदगाव येथे आम.नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी हायवे अधिकारी यांना ज्या काही मागण्या नांदगाव वासियांच्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा.छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासाठी दिरंगाई नको त्या तातडीने मार्गी लावा .अशा सुचना आमदार नितेश राणेंनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.
यावेळी महामार्ग प्राधिकरण चे कनिष्ठ अभियंता श्री. जाधव,केसीसी चे पांडे,उप अभियंता श्री कुमावत,केसीसी ठेकेदार कंपनी अधिकारी, पोलिस निरीक्षक हेमंत हुलावले,पोलीस हवालदार मंगेश बावधाने,इंपाळ , तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,असलदे उपसरपंच संतोष परब, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुषण म्हसकर ,भुपेश मोरजकर, आदी उपस्थित होते.
या भेटी दरम्यान कोण कोणती कामे करावयाची आणि पावसाळ्या पूर्वी कोणती कामे तातडीने पूर्ण करायची याबाबतच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्षच दिल्या आहेत . तसेच हायवे संदर्भात गतिरोधक बसविण्याची मागणी नसताना गतिरोधक का बसविण्यात आले. याबाबत कोणी लेखी मागणी केली काय ? ती आम्हाला दाखवा उगाच आमच्या नावाची बदनामी करु नका अशी आक्रमक भूमिका असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी व्यक्त केली यावर अधिकारी वर्ग निरुत्तर झाले होते.