You are currently viewing देवगडात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार : सतीश सावंत

देवगडात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार : सतीश सावंत

देवगड

नवीन वर्षात देवगड पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र जोगल यांनी शिवसेना प्रवेश करून चांगली सुरुवात केली आहे. देवगडात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. ज्या-ज्या लोकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे, त्यांचा योग्य मानसम्मान शिवसेना खासदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून केला जाईल. विरोधक नेहमी शिवसेनेला धक्के दिले म्हणतात. आजचा शिवसेना प्रवेश हा धक्का आहे की काय आहे तो आता त्यांनी विचार करावा, असं प्रतिपादन शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केलं.

देवगड, कणकवली, वैभववाडी मतदारसंघात शिवसेना बळकट करणार असून पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या देवगड तालुक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करूया, असं मत शिवसेना नेते सतीश सावंत यांनी व्यक्त केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 20 =