You are currently viewing तिची फेकलेली पर्स सापडली….

तिची फेकलेली पर्स सापडली….

तिच्या मृत्यूचे गूढ वाढतंय… पोलिसांसमोर आव्हान

कोलगाव येथील जंगलात अत्याचार करून लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना गळ्यावर हाताचा दाब पडल्याने मृत झालेली महिला गीतांजली मळगावकर हिला संशयित आरोपींनी आंबोली घाटातील धबधब्याच्या अलीकडील खोल दरीत फेकून दिले.अशी माहिती संशयित आरोपींनी दिली होती. परंतु महिला ५० वयाची असली तरी जेव्हा तिला त्रास होत असेल, जीव जाण्याची पाळी येत होती तेव्हा नक्कीच ती प्रतिकार करून हात बाजूला करू शकत होती एवढ्या ताकदीची ती नक्कीच असणारच. अन्यथा चार युवकांसोबत ती त्यांच्या गाडीतून गेलीच नसती. कोलगाव येथे जंगलात तिघे साथीदार पहारा देत असताना आपलं अनैतिक कृत्य कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून गाडीचे दरवाजे बंद करून अतिप्रसंग करत असताना ऑक्सिजनची कमतरता भासून वयाच्या मानाने महिलेचा दम गुदमरण्याची शक्यता आहे, त्यातून ती बेशुद्ध सुद्धा झाली असेल किंवा काही वेळ हृदय बंद पडणे वगैरे प्रकारही घडला असेल. युवक तरुण असल्याने आणि कदाचित नशेच्या गर्तेत असल्याने त्याला त्रास झालाही नसेल. परंतु सदर महिला बेशुद्धावस्थेत गेल्यावर तिला मृत समजून नशेच्या भरात युवकांनी आंबोली घाटात दरीत फेकलेले असू शकते.
पोष्टमॉर्टेम रिपोर्ट नुसार मृत्यू १ ते ४ तारीखच्या दरम्यान झाला तर ३१ रोजी महिला मृत झाली होती की नाही? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे ३१ तारीखला महिलेला कोलगाव येथील जंगलात नेल्यावर नक्की काय घटना घडली? संशयित आरोपी सांगतात तो घटनाक्रम योग्य आहे किंवा गुन्ह्यात अजून कोणाचा हात असून तो लपविण्यासाठी संशयित आरोपी घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करतात याबद्दल सखोल तपास होणे आवश्यक आहे. मृत महिलेच्या वस्तू पर्स, मोबाईल इत्यादी फेकलेली जागा सुद्धा दाखवताना आरोपींकडून विसंगत माहिती येत आहे, योग्य माहिती ते देत नाहीत. त्यामुळे गुन्ह्याविषयी गूढ वाढत चालले आहे.
प्रथमदर्शनी संशयित आरोपींनी भीतीपोटी बरीच माहिती दिली होती. परंतु जामिनासाठी वकील भेटल्यावर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे दिसून येत आहे. मृत महिलेची आज मिळालेली पर्स तिचीच आहे की अन्य कोणाची? त्या पर्समध्ये काय काय आहे, काही माहिती त्यातून मिळते का? अनेक पद्धतीने तपास होणे बाकी आहे. पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा घडल्यापासून गुन्हेगारांचा शोध लावण्यापर्यंत अतिशय उत्तम कामगिरी केलेली असून नक्कीच ती अभिमानास्पद आहे.
संशयित आरोपींना अटक झाल्यावर आरोपींचे ड्रग्स कनेक्शन सुद्धा समोर येत होते. संशयित आरोपींच्या संपर्कातील काही व्यक्तींमधून खाजगीत ड्रग्स कनेक्शन बाबत बोलले जात होते. तसेच त्यांना ड्रग्स पुरवणारी व्यक्ती सुद्धा भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संशयितांसाठी वकील उभे करताना त्यांच्या घरच्या लोकांनी केले की ड्रग्स पुरवठा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना वकील मिळवून दिले हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे संशयित आरोपींच्या गुन्ह्याच्या तपासाबरोबर त्यांचे ड्रग्स कनेक्शन सुद्धा तपासणे आवश्यक असून त्यातून गुन्ह्याबाबतच आणखी उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसात गुन्ह्याचा तपास किती खोलवर होतो आणि काय सत्य उजेडात येते ते पाहणे गरजेचे असून आरोपी माहिती देताना टाळाटाळ करत असल्याने गुन्ह्यात अजून काय गूढ दडले आहे का????

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा