गुरव ज्ञाती बांधव समाज संघटनेचे जिल्हाधिका-यांना निवेदन
वैभववाडी प्रतिनिधी
कोरोना संकटात मंदिरे बंद असल्याने गुरव पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत शासनाने गुरव समाजाला अर्थसाह्य करावे. या मागणीचे निवेदन गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात 11 प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास कोरोनाच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष अँड. आण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरू असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई समाजाला मिळावी, इनाम वर्ग 3 जमिनीवर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, समाजातील युवकांना उद्योग उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहासाठी जागा व निधी द्यावा, सर्व देवस्थान ट्रस्ट मध्ये 50 टक्के प्रतिनिधित्व मिळावे, समाजाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा, 60 वर्षावरील पुजाऱ्यांना निर्वाह भत्ता मिळावा, या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत – गुरव, प्रदेश अध्यक्ष महेश गुरव, महिला जिल्हाध्यक्ष सायली गुरव, जिल्हा युवा अध्यक्ष सदाशिव गुरव, कणकवली अध्यक्ष चंद्रकांत गुरव, गुरुनाथ गुरव, सूर्यकांत गुरव, रमेश गुरव, कुडाळ अध्यक्ष अभिनव गुरव, सत्यवान गुरव, चंद्रकांत गुरव, संतोष गुरव, संकेत गुरव, संदीप जाधव, नीलेश गुरव, योगेश गुरव, शशांक गुरव, प्रसाद गुरव, प्रथमेश गुरव व समाज बांधव उपस्थित होते.