You are currently viewing वेंगुर्ले – बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ले हद्दीतील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवा अन्यथा वृक्षारोपण

वेंगुर्ले – बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ले हद्दीतील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवा अन्यथा वृक्षारोपण

वेंगुर्ले भाजपा चा सार्वजनिक बांधकाम विभागास इशारा

वेंगुर्ले – बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ले तालुक्यातील मठ – बोवलेकरवाडी , आडेली – खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत . तसेच खड्डे वाचवीण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे .
गेल्या वर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते , परंतु ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पुन्हा एकदा त्या ठीकाणी खड्डे पडलेले आहेत , त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . तसेच दुचाकी व तिनचाकी रिक्षा चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
त्यामुळे पावसाळ्यापुर्वी लवकरात लवकर सदर रस्त्याची डागडुजी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा , अन्यथा भाजपा च्या वतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला .
यावेळी भाजपा चे प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर , ओंकार चव्हाण , शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा