You are currently viewing शौचालय बांधकामासाठी ऑनलाईन अनुदान प्रक्रिया

शौचालय बांधकामासाठी ऑनलाईन अनुदान प्रक्रिया

शौचालय बांधकामासाठी ऑनलाईन अनुदान प्रक्रिया

सिंधुदुर्गनगरी

 स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शौचालय बाधवयाचा आहे . अशा लाभार्थ्यांकरिता अनुदान मागणी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. या प्रणालीचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यवा असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले  आहे.

             स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यातील ज्या कुंटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाहीत अशा लाभार्थ्यीना आता ऑनलाईन प्रणालीव्दारे शौचालय प्रात्साहन अनुदानाकरीता मागणी करता येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांने मोबाईल, कॉम्पुटर, सायबर कॅफे अथवा इतर सामान्य ऑनलाईन सेवेव्दारे SBM-G या संकेत स्थळावरुन अथवा http://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx या लिंक व्दारे Citizen corner किंवा whats new या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. केलेल्या नोंदणीची तपासणी करुन पात्र लाभार्थ्यांला वैयक्तिक शौचालय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील बाधकाम करावयाचे शिल्लक असेलेले लाभार्थी यांनी प्रोत्साहन अनुदानाकरिता या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून आपली नाव नोंदणी करावी. याबाबतच्या अधिक माहिती करिता आपली ग्रामपंचायत, गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) पंचायत समिती किंवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन ही या पत्रकात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =