You are currently viewing रविवारी रात्री २ वाजता आ. वैभव नाईक यांनी साजरा केला दशावतारी कलाकार दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस

रविवारी रात्री २ वाजता आ. वैभव नाईक यांनी साजरा केला दशावतारी कलाकार दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस

दशावतारातील महाखलनायक मास्टर दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पोईप येथे रविवारी रात्री २ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी आ. वैभव नाईक यांनी दादा राणे कोनसकर यांच्याबद्दल गौरोद्गार काढले. तसेच केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्री देखील आ. वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकारासाठी वेळ दिल्याने दशावतारी कलाकारांवरील त्यांचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले.


पोईप येथील श्री.देव वेताळ मंदिराच्या वर्धापन दिनास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रविवारी रात्री उपस्थित राहून दर्शन घेतले. वर्धापन दिनानिमित्त लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा अजिंक्य तारा दशावतारी नाट्य प्रयोग सुरु होता. त्यादरम्यानच दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांना समजताच रंगमंचावर संगीतमय वादनाच्या साथीने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. वैभव नाईक हे नेहमीच दशावतारी कलाकारांना सहकार्य करतात याची आठवण करून देत दशावतारी नाट्यमंडळाने त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे पंकज वर्दम,शिवरामपंत पालव, बाळा सांडव, पोईप गावचे प्रमुख मानकरी परशुराम नाईक, दत्ताराम पालव, बबली पालव, गोपीनाथ पालव, विठ्ठल नाईक, श्री. तावडे, दशावतारी कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा