You are currently viewing सावंतवाडीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी साजरी

सावंतवाडीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी साजरी

सावंतवाडी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपरिषदच्या पत्रकार कक्षात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार कक्षात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अखिल पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व जिल्हा पत्रकार संघ सदस्य हरिश्चंद्र पवार, जिल्हा पत्रकार संघ माजी सचिव अभिमन्यू लोंढे, पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष राजेश मोंडकर, उमेश सावंत, दीपक गावकर, तालुका खजिनदार रामचंद्र कुडाळकर, जतिन भिसे, नरेंद्र देशपांडे, अमोल टेमकर आदी उपस्थित होते. यावेळी गजानन नाईक म्हणाले अखिल मराठी पत्रकार परिषद यांनी गेल्या कित्येक वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महामार्गाला द्यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, शासन याकडे लक्ष देत नाही. त्यासाठी आम्ही आता लक्ष वेधण्यासाठी निवेदन देत आहोत. आतातरी महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर महामार्गाचे नाव द्यावे असे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा