वेंगुर्ला
सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस यांच्या विद्यमाने बुध्द पौर्णिमा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शनिवारी १४ मे ला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उदघाटक शंकर घारे – ग्रा.पं. सरपंच, सुशिल परब – ग्रा.पं. उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य,तुळस ग्रामस्थ उपस्थित होते.
रविवारी महिलांसाठी होम निनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उदघाटक मनीष दळवी(सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष),विजय रेडकर(माजी.ग्रा.सरपंच तुळस) उपस्थित होते.सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.
सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन करण्यात आले. उदघाटक संजय पडते,विद्याधर परब(सिंधुदुर्ग बँक संचालक),यशवंत परब (माजी पं. समिती सभापती)प्रमुख वक्ते प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर(बी.के.खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला)सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळेकर(वेताळ प्रतिष्ठान संस्थापक तुळस)उपस्थित होते.
कोकणचा आइनस्टाइन कु.विजय दिनेश तुळसकर यांचा गायनाचा कार्यक्रम तसेच
इंद्रधनू कलामंच दाभोली यांची एकांकिका सादर करण्यात आली.
महिला बचत गट व सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.