नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी गावातील डोंगरात झोपडी बांधून त्यात करीत आहेत अभ्यास
लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आंदुर्ले गावात बीएसएनएल टॉवरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार का?
कुडाळ
एकीकडे आपला देश 4G वरून 5G नेटवर्कची स्वप्न पाहत असताना आपल्याकडे असं सुध्दा गाव आहे जिथे मोबाईल नेटवर्क च्या एका एका काडीसाठी रानोमाळ भटकाव लागतंय. होय हि वस्तुस्थिती आहे कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाची. कोरोणामुळे सर्व शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणं पद्धतीचा अवलंब करावा लागला आहे पण आंदुर्ले गावात मोबईल टॉवर नसल्याने नेटवर्क साठी विद्यार्थ्यांना रानोमाळ भटकत फिरावं लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच खूप मोठे नुकसान आणि हाल होत आहेत. आजच्या 4G, 5G मोबाईल नेटवर्क च्या युगात आंदूर्ले गावात सुसज्ज मोबाईल नेटवर्क सुविधा नसणं हे इथल्या ग्रामस्थांचे दुर्दैव आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पुढाऱ्यांचा अकार्यक्षमपणा म्हणावा लागेल.
तीन ते चार वर्षाचा कालावधी उलटूनही आंदुर्ले गावातील बीएसएनएल टॉवरचा प्रश्न मार्गी न लागल्याने बीएसएनएल सेवा ठप्प असल्याने कोरोना पार्श्वभूमीवर नोकरदारवर्ग, विध्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यास चालू असल्याने मोबाईल नेटवर्क अभावी व्यावसायिक, शैक्षणिक नुकसान होत आहे. गावात कोणत्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विध्यार्थी गावातील डोंगरात झोपडी बांधून त्यात अभ्यास करीत आहेत. तर नोकरदारवर्ग गावच्या सीमावर्ती भागात अथवा डोंगरात जिथे नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. गावात बीएसएनएल कंपनीचा टॉवर असूनही नसल्यासारखा आहे. दूरसंचार विभागाच्या गलथान कारभारामुळे तो टॉवर पुन्हा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. तो पूर्ववत करण्यात यावा यासाठी गावाने आंदोलन करूनही तसेच आमदार, खासदार यांना निवेदने देऊनही याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय या डोंगरावर बिबट्या वाघाचे दर्शन घडतं असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मुलांना डोंगरात पाठवणे धोकादायक बनले असल्याची आंदुर्ले गावचे ग्रामस्थ आंदुर्ले विकास सोसायटीचे चेअरमन महेश राऊळ यांनी चिंता व्यक्त केली आहे.यावेळी संतोष खानोलकर, सूरज राऊळ, चेतन राऊळ, योगेश राऊळ,अंकित गावडे,राकेश राऊळ,दीपक चव्हाण उपस्थित होते.
तसेच महेश राऊळ,सतिश राऊळ,प्रफुल राऊळ,रुपेश राऊळ,निनाद राऊळ,कुणाल मुरकर,ओमकार राऊळ,अश्विनी राऊळ,साक्षी राऊळ,या सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन ही झोपडी उभी केली.व महेश दत्तात्रय राऊळ यांनी आपल्या डोंगरावरील जमिनीत झोपडीसाठी जागा दिली.
आता तरी प्रशासन लोकप्रतनिधी, राजकीय पुढारी यांचे डोळे उघडतील आणि लवकरात लवकर एक सुसज्ज मोबाईल नेटवर्क सुविधा आंदूर्लेवासीयांना मिळेल अशी आशा विद्यार्थी व ग्रामस्थांना आहे.