You are currently viewing रानटी हत्ती प्रश्न सोडवू शकत नसाल तर शासकीय नोकरीत दहा टक्के आरक्षण द्या

रानटी हत्ती प्रश्न सोडवू शकत नसाल तर शासकीय नोकरीत दहा टक्के आरक्षण द्या

केर येथे जागर आंदोलनात ग्रामस्थांची मागणी

दोडामार्ग

गेली वीसवर्षे रानटी हत्ती प्रश्न सोडविण्यास वनविभाग सफसेल अपयशी ठरल्याने केर गावातील ग्रामस्थांनी जागर आंदोलनात तीव्र नाराजी व्यक्त केली. जर हत्ती प्रश्न सोडवता येत नाही तर इथला युवाईला रोजगाराचे साधन मिळण्यासाठी ज्या भागात सलग दहा वर्षाहून अधिककाळ हत्ती आहेत त्याचा विशेष अहवाल तयार करून हत्ती बाधीत गावातील युवकांना सवलत दाखले वाटप करून शासकीय नोकरीत दहाटक्के आरक्षण तसेच शासनाच्या विविध योजनात आरक्षण द्यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितीत उपवनसंरक्षक श्री.नानवर यांनी हत्ती वास्तव्य अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहचल्या जातील अशी ग्वाही दिली त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जागर आंदोलन मागे घेण्यात आले.

केर चव्हाटा मंदीर समोर सुरू झालेल्या जागर आंदोलनात सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, माजी सरपंच प्रेमानंद देसाई, जेष्ठ ग्रामस्थ रत्नकांत देसाई, गोपाळ देसाई, तुकाराम देसाई, अनंत देसाई आदीसह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपवनसंरक्षक श्री.नानवर व त्यांची तालुकास्तरावरील टीमही उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा