You are currently viewing सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालवैज्ञानिक योगेश जोशीचा गौरव…

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालवैज्ञानिक योगेश जोशीचा गौरव…

सावंतवाडी

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा विद्यार्थी कु.योगेश विवेकानंद जोशी याने कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. दरम्यान त्याच्या या यशाबद्दल येथील शिक्षण प्रसारक मंडळाकडून त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव व्ही . बी . नाईक , खजिनदार सी . एल . नाईक , शाळा समिती अध्यक्ष डॉ . दिनेश नागवेकर , संचालक अमोल सावंत , चंद्रकांत सावंत , सौ . व्ही . एन . मुळीक , सौ . छाया सावंत , योगेश जोशीचे आई – वडिल, नवनिर्वाचित संचालक सतिश बागवे, उपमुख्याध्यापक शेखर नाईक, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते .

सत्कारप्रसंगी बोलताना योगेशने या स्पर्धेसाठी युरेका संस्थेच्या श्रीमती सुषमा केणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले . तसेच एस . पी . के . कॉलेजचे प्रा . डॉ . देठे , प्रा . डॉ . गणेश मर्गज , डॉ . शिवराम पई आर . पी . डी . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . जगदिश धोंड शिक्षक श्री . दशरथ शृंगारे , श्री . प्रल्हाद सावंत व आपले आई- वडिल यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले . या स्पर्धेत सुमारे ३७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते . लेखी , प्रात्यक्षिक , प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात ही स्पर्धा होते . त्यातून ०.७५ % विद्यार्थी हे बक्षिसपात्र ठरतात . योगेशने ‘ देवत्व देऊन राखीव ठेवलेली झाडे ‘ या विषयावर प्रकल्प केलेला होता . त्यासाठी त्याने माजगाव , ओटवणे , कारिवडे , शिरशिंगे , वेर्ले , शेर्ले , असनिये , तांबुळी इत्यादी गावांना भेटी देऊन तेथील झाडांचा अभ्यास केला होता . सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण ठाणे के . इ . एम . हॉस्पिटलचे रेडी ऑलॉलिस्ट डॉ . सतिश पांडे यांचे हस्ते झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 14 =