इचलकरंजी शहरासह हातकणंगले तालुक्यातील शाळांचा समावेश
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून इचलकरंजी शहरासह हातकणंगले तालुक्यातील विविध शाळांना थ्री-इन-वन प्रिंटरचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम बालाजी माध्यमिक विद्यालयात आमदार जयंत साळगावकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.नुकताच त्यांनी आपल्या आमदार फंडातून विविध शाळांसाठी आवश्यक असलेले
इन-वन प्रिंटर मंजूर करुन घेतले आहेत.सदरचे प्रिंटर इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यातील विविध शाळांना नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम बालाजी माध्यमिक विद्यालयात पार पडला.
यावेळी आमदार जयंत आसगावकर म्हणाले, तुमचे कोणतेही शैक्षणिक प्रश्न असोत ते मला सांगा, यासाठी मी मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न करेन. जिल्ह्यातील मंत्री महोदय आपल्या पाठीशी असल्याने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत तज्ञ लोकांच्या समवेत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संस्था चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धर्मादाय कार्यलयात तज्ञ मंडळींच्या समवेत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात विजेची टंचाई असून तेथील शाळांना सोलर एनर्जी सिस्टीम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास बालाजी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, हातकणंगले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पी. डी. शिंदे, के. के. पाटील, मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर इरफान अन्सारी व खजनिस नंदकुमार गाडेकर, शेखर शहा, बालाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एम. एस. रावळ, शंकर पोवार, विनायक सपाटे, संभाजी खोचरे, प्रशांत पोवार, अभिजित गायकवाड, समीर घोरपडे, श्रीकांत पाटील, प्राचार्य भगाटे सर, बी. के. मोरे, शिवाजी नाईक, शिवाजी पाटील, संजय पाटील, विजय जाधव, एम. एम. कांबळे, संदीप पाथरे, शिवाजी पाटील, विनोद उत्तेकर, संजय ओमासे, सुभाष कलागते, संजय परीट, पी. डी. खाडे, कोळी सर, एस. डी. कांबळे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.