सहकार मंञी बाळासाहेब पाटील ,विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती
इचलकरंजी / प्रतिनिधी
फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने जवाहर सहकारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे
यांना यंदाचा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वस्ञनगरीसह परिसरात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सहकार ,
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.विशेष म्हणजे सहकार चळवळीतून उभारलेल्या सहकारी संस्थांच्या उभारणीचा इतिहास हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रगतशील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासात खासदार कै. दत्ताजीराव कदम तसेच विविध मान्यवरांसोबत कल्लाप्पाण्णा
आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या भरीव कार्याची दखल घेवूनी त्यांना
फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने
यंदाचा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर याांच्य हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी फलटण संस्थानकडून संस्कृती व शिक्षणाचा ठेवा जोपासण्याचे काम केले जात आहे. भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टीकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार जगन्नाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करुन खर्या अर्थाने पुरस्काराचा गौरव करण्यात आला आहे, असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती निवडण्याचे काम कठीण आहे. मात्र सहकाराच्या माध्यमातून कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उभारलेले विकासाचे पर्व आणि औषध क्षेत्रात जगन्नाथ शिंदे यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे , आमदार दीपक चव्हाण तसेच सत्कारमूर्ती आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवांजली नाईक निंबाळकर, सौ. योगिनी पोकळे, सौ. निवेदिता नाईक-निंबाळकर फलटण पंचायत समिती सभापती विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, शिरीष देशपांडे, सुभाष शिंदे, श्रीराम-जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, राजेंद्र लड्डा, जवाहर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, विद्यमान व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, विलास गाताडे, जिनगोंडा पाटील, आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभय काश्मिरे, संजयकुमार कोथळी, सुमेरु पाटील, शितल आमण्णावर, गौतम इंगळे, विजय कुंभोजे, शेखर पाटील, प्रकाशराव सातपुते सुरज बेडगे, बाबासाहेब पाटील, नंदू पाटील सर्जेराव पाटील, महावीर कुरुंदवाडे, एम. के. कांबळे, शेती अधिकारी किरण कांबळे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सतिश कोष्टी, सुभाष गोटखिंडे, राहुल घाट, दत्तात्रय कनोजे, रफिक खानापुरे, शांतिनाथ बेडक्याळे, तौफिक मुजावर, प्रकाश चौगुले आदींसह मान्यवर उपस्थित होते.