You are currently viewing कुडाळ येथे सिंधुदुर्ग कृषि, पशुपक्षी, पर्यटन महोत्सव

कुडाळ येथे सिंधुदुर्ग कृषि, पशुपक्षी, पर्यटन महोत्सव

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने दि.17.5.2022 ते दि.20.5.2022 या कालावधीत कुडाळ एस.टी.डेपो या ठिकाणी कृषि, पशुपक्षी व पर्यटन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या महोत्सवामध्ये विविध शेती विषयक चर्चासत्रे, शास्त्रज्ञ परिसंवाद, कृषिविषयक प्रात्यक्षिके इत्यादी चे आयोजन करणेत आलेले आहे. तसेच सदर महोत्सवामध्ये विविध कृषि उत्पादने, सुधारीत शेती औजारे, आंबा, काजू, फणस, याबरोबरच खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची मेजवानी असलेले स्टाॅल असणार आहेत.

हे प्रदर्शन दि.17.5.2022 ते दि.20.5.2022 असे चार दिवस असुन दर दिवशी संध्याकाळी लोकप्रिय व प्रसिद्ध अशा कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

या पर्यटन महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे, ते म्हणजे दि.18.5.2022 रोजी सकाळी 8.30 वाजता कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारणे आयोजित केलेली न भुतो न भविष्यती अशी ‘शोभायात्रा’. हया शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे 97 इव्हेन्ट सहभागी होणार आहेत. पशुसवर्धन विभागाचे 35 बैलगाड्या, 24 प्रकारचे प्रदर्शनीय वळू, घोडी, बदके, ससे, कोंबडी, कबुतरे, प्रदर्शनीय शेळ्या-बोकड, वेगवेगळ्या जातींचे प्रदर्शनीय कुत्रे, चलचित्र रथ सहभागी होणार आहेत. याबरोबरच कुडाळ पंचायत समितीच्या अंगणवाडी सेविका चा पोषण पालखी चित्ररथ, महिलांचा नऊवारी वेशभूषेतील पोषण टोपल्या चित्ररथ, लेझीम पथक व मोटारसायकल रॅलीचा सहभाग असेल. तर कुडाळच्या शिक्षक कर्मचारी यांचा विविध दशावतार पात्रांनी युक्त असा चित्ररथ व एकसुत्री वेशभूषेतील मोटारसायकल रॅली सहभागी असेल. बचतगट महिलांचा पोषण परसबाग चित्ररथ, 100 महिलांचा सहभाग असलेली, प्रांतवार वेशभूषा असलेला व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली तसेच दणकेबाज महिलांचे ढोलपथक सहभागी असणार आहे. आरोग्य विभागातील 40 कर्मचाऱ्यांची पारंपरिक शेतकरी वेशभूषेतील मोटरसायकल रॅली व शेतकरी वेशभूषेतील चित्ररथ सहभागी होणार आहे. कृषि विभागाकडील गावठी बाजार, कृषि यांत्रिकीकरण चित्ररथ तसेच कोंबडा,आंबा,मोर, हत्ती, पोपट ही चलचित्रे सहभागी असतील. ग्रामसेवक बांधवांची विठ्ठलाची वारकरी दिंडी, नेरूर मांड उत्सवातील चलचित्र, नऊवारी साडीतील महिलांचे ढोलपथक सहभागी असेल.

अशा या भव्यदिव्य शोभायात्रेत अंदाजे 1000 शेतकरी, पशुपालक, अधिकारी, कर्मचारी व अंदाजे 150 विविध प्रकारची जनावरे सहभागी होणार आहेत.

ह्या शोभायात्रेसाठी सर्वजण सकाळी 8 वाजेपर्यंत कुडाळ हायस्कूल येथे जमणार असुन, त्यानंतर 8.30 वाजता कुडाळ पोलीस स्टेशन येथे तयार करणेत आलेल्या दर्शक गॅलरी येथून शोभायात्रेचे उद्घाटन व शुभारंभ होणार आहे. तेथुन शोभायात्रा कुडाळ बाजारपेठेतील जिजामाता चौक, गांधीचौक, जुने एस.टी.स्टॅड, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भैरव मंदीर मार्गे कुडाळ पंचायत समिती, तसेच गुलमोहर हाॅटेलमार्गे प्रदर्शनस्थळी रवाना होणार आहे. या शोभायात्रेत सहभागी बैलगाडी व चित्ररथांचे पंचायत समिती येथे तयार करण्यात आलेल्या परिक्षक गॅलरी येथे तज्ञ परीक्षकांकडून परिक्षण केले जाणार व त्यांना सन्मानित केले जाणार आहे. यासाठी कुडाळ पंचायत समितीचे कृषी, पशु, ग्रामसेवक , शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी,MSRLM विभाग, सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग मिळत असून अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.

ह्या भव्यदिव्य व वैविध्यपूर्ण अशा शोभायात्रेचा सर्व सिंधुदुर्गवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर, श्री.संजय कापडणीस अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.राजेंद्र पराडकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा), श्री.विध्यानंद देसाई जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, श्री.सुधिर चव्हाण कृषि विकास अधिकारी व कुडाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.विजय चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा