You are currently viewing हरकुळ बु. येथे शिवसेनेतर्फे सोमवारी मोफत आरोग्य शिबीर – डॉ. प्रथमेश सावंत

हरकुळ बु. येथे शिवसेनेतर्फे सोमवारी मोफत आरोग्य शिबीर – डॉ. प्रथमेश सावंत

कणकवली

शिवसेना विभाग हरकुळ बुद्रुकच्यावतीने सोमवारी 16 मे रोजी सकाळी 10 वाजता हरकुळ बुद्रुक उपकेंद्र येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबईतील नामवंत डॉक्टर्स तपासणी करणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक हे उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्याधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, अतुल रावराणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

डॉ. विनायक तायडे हे या शिबिराचे प्रमुख डॉक्टर म्हणून काम पाहणार आहेत. या शिबिरात स्त्री रोग, संधिवात, पोटाचे विकार, त्वचा विकार, दमा, मधुमेह अशा विविध आजार यांची तपासणी केली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा