You are currently viewing मळेवाड हेदुलवाडी येथे एकदिवसीय रेस्क्यू ट्रेनींग…

मळेवाड हेदुलवाडी येथे एकदिवसीय रेस्क्यू ट्रेनींग…

प्रशिक्षक न्हानु मुळीक यांनी केले मार्गदर्शन

सावंतवाडी
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्यावतीने मळेवाड हेदुलवाडी येथे एक दिवसीय रेस्क्यू ट्रेनींग आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य, मार्गदर्शक प्रशिक्षक न्हानु उर्फ बापू गुणाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या ब्रिजच्या सुरुवातीपासून बांधणी व याचा उपयोग कसा करायचा याबाबत सविस्तर प्रात्यक्षित दाखविले. तसेच पाण्यात पोहणे, लाईफ जॅकेट याबाबत माहिती दिली. न्हानु मुळीक हे बऱ्याच रेस्क्यू ऑपरेशन मध्ये भाग घेत असतात. आपल्याप्रमाणे युवक युवतींनी यात पुढाकार घेऊन या कामात भाग घेण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले. या कामात त्यांची कन्या गौतमी मुळीकचे त्यांना योगदान मिळते. पाण्यात पोहणे किंवा कोणावरही एखादा प्रसंग ओढावला तर त्याचा बचाव कसा करायचा याबतही त्यांनी प्रात्यक्षिक दाखविले. याचा उपयोग लहानापासून मोठ्यांपर्यँतच्या सर्व व्यक्तींना झाला.
यावेळी श्रीकांत नाईक, उत्तम नाईक, विजय गावडे, प्रकाश राऊत, बबन राऊत, सागर नाईक, विलास सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
या रेस्क्यू ट्रेनींगमध्ये मुळीक यांनी सस्पेन्शन ब्रिज, ट्रॅनगुलर ब्रिज, कमांडो ब्रिज, आणि मंकी ब्रिजचे प्रशिक्षण दिले.
मनात असलेली भीती या ट्रेनिगमुळे कमी झाल्याचे ट्रेंनिंगमध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी सांगितलं. कोरोनाविषयीचे सर्व नियमांचे पालन करून हे ट्रेनींग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. यावेळी त्यांना श्रीकांत नाईक, उत्तम नाईक, विजय गावडे, प्रकाश राऊत, बबन राऊत, सागर नाईक, विलास सावंत यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा