जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांची अप्रतिम काव्यरचना
अंगणात होती
एक बंगळी
काळी शिसवाची
हत्तींची साखळी…
थकले भागले
बंगळीवर विसावले
मनीच्या भावनांना
मोकळे केले..
झोके घेतले
उंच नभाकडे
स्पर्शूनी चांदण्यांना
गाठले स्वप्नकडे…
झुळुक वार्याची
अंगावर पांघरली
झुला झुलताना
कवेत घेतली….
मातीतल्या पायांनी
झोका घेताना
जमीन सोडली
नभी झेपावताना…
माहेरीचा झोका
एकमेव कसा
मनात राहूनी
दिला भरवसा…
राधिका भांडारकर पुणे.