मुणगे येथील श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ आयोजित कृषी मार्गदर्शन शिबीर उत्साहात झाले. शेतकऱ्यांकडून या शिबिरास अल्प प्रतिसाद मिळाला.
कृषी शिबिराचे उद्घाटन नरसिंह पंत वालावलकर यांच्या हस्ते झाले. ग्रामविकास मंडळाचे प्रदीप परुळेकर, भगवती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय बोरकर, बाळा मुणगेकर, नीलेश परुळेकर, रत्नदीप पुजारे, विलास मुणगेकर, सरपंच साक्षी गुरव, पोलीस पाटील साक्षी सावंत, प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ. विजयकुमार शेट्ये, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे डॉ. केशव देसाई, डॉ. विलास सावंत, डॉ. विजय दामोदर आदी उपस्थित होते.
डॉ. विजयकुमार शेट्ये यांनी भात शेतीबाबत मार्गदर्शन केली आंबा संशोधन केंद्र गिर्ये रामेश्वराचे डॉक्टर विजय दामोदर यांनी कोणत्या कलमांना फळधारणा होते, त्याचप्रमाणे आंबा कलमांची छाटणी या विषयी माहिती दिली. अजित रासम, चंद्रकांत रासम, संतोष लब्दे, सुनील सावंत, भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सौ. गौरी तवटे, सहा. शिक्षक पी. एन. बागवे, कृषी सहायक सौ. विनिता तिरवडे आदी उपस्थित होते.