*ओरोस येथे जाणून घेणार समस्या*
ओरोस :
अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष, इतर दोन सदस्य एकदिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, यावेळी समाजाच्या समस्या जाणून घेणार आहेत. गुरुवारी १२ मे ला सकाळी १० ते १२ या वेळेत ओरोस येथील माध्यमिक पतपेढी सभागृहात अनुसूचित जाती जमातीच्या सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पीडित समाजबांधव यांनी आपापल्या अडचणी, मागण्या, व्यथा, सूचना, तक्रारी लेखी स्वरूपात मांडण्यासाठी जातीनिशी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८.५० लाख लोकसंख्येपैकी सुमारे एक लाखापेक्षा जास्त अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक समाजाच्या संघटना नोंदणीकृत असून सर्व पदाधिकारी व सदस्य आपापल्या समाजासाठी गेली अनेक वर्ष जीवतोड मेहनत घेऊन सक्रिय योगदान देत आहेत..
परंतु बऱ्याच वेळा समाजात काम करताना समाजकंटकांनी निर्माण केलेल्या अडचणीमुळे आपल्या समाजाला अनंत यातना भोगाव्या लागतात यासाठीच त्याविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देणारी यंत्रणा म्हणजेच मागासवर्गीय आयोग होय हे सर्वश्रुत आहे..
संविधानाने दिलेले अधिकार जर मागासवर्गीय समाजाला मिळत नसतील तर यापूर्वी सुध्धा अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने आपल्या जिल्ह्यात झालेली आहेत.
अध्यक्ष, अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र व इतर दोन सदस्य यांचा एकदिवसीय दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन आयोजित केला आहे. यावेळी मागासवर्गीय समाजातील सर्व वंचित, अन्यायग्रस्त, पीडित, बहिष्कृत समाजबांधवांना आपल्यावर झालेला अन्याय किंवा अत्याचार थेट मागासवर्गीय आयोगाच्या समितीसमोर व्यथा लेखी व तोंडी स्वरूपात व्यक्त करण्याची सुसंधी उपलब्ध झालेली आहे..
सकाळी १० ते १२ यावेळेत माध्यमिक पतपेढी सभागृह, ओरोस येथे अनुसूचित जाती जमातीच्या सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पीडित समाजबांधव यांनी आपापल्या अडचणी, मागण्या, व्यथा, सूचना, तक्रारी लेखी स्वरूपात मांडण्यासाठी जातीनिशी हजर राहून सकाळच्या सत्रात होणाऱ्या आढावा बैठकीस उपस्थित रहावे. दुपारी १२.३० वाजता मागासवर्गीय समिती सोबत भेट शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे नियोजित आहे. आपल्या सर्व संघटना पदाधिकारी व सदस्यांनी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात रहात असलेल्या समाजबांधवांपर्यंत हा मेसेज पोचाविण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री. नंदन वेंगुर्लेकर, श्री. महेश परुळेकर, श्री. संदीप कदम, श्री. रावजी यादव, श्री. सुजित जाधव, श्री. प्राजक्त चव्हाण, श्री. छोटू कदम, श्री. अंकुश जाधव, श्री. विश्वनाथ कदम, श्री. विद्याधर कदम, श्री. अनिल तांबे, श्री. निलेश ठाकूर, श्री. रतन खोटले यांनी केले आहे.