You are currently viewing दिल्लीचा कोलकातावर १८ रन्सने विजय

दिल्लीचा कोलकातावर १८ रन्सने विजय

शारजाह :

इंडियन प्रीमियर लीग २०२० मधील १६वी मॅच दिल्ली आणि कोलकाता या टीम्समध्ये झाली असून ही मॅच दिल्लीच्या टीमने जिंकली आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात काही बरी झाली नाही.मात्र सुनील नरिने अवघ्या तीन रन्स करुन माघारी परतला.

मॅचच्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने टॉस जिंकून प् पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलेल्या दिल्ली टीमने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावत २२८ रन्स केल्या आणि कोलकातासमोर विजयासाठी २२९ रन्सचं आव्हान उभं केलं.

प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या टीमची सुरुवात चांगली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ रन्सची पार्टनरशिप केली. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक रन्स केल्या. श्रेयस अय्यरने ३८ बॉल्समध्ये नॉट आऊट ८८ रन्स केल्या. पृथ्वी शॉ याने ६६ रन्स, रिषभ पंत याने ३८ रन्स, शिखर धवनने २६ रन्स केल्या. दिल्लीची टीम आयपीएल २०२० च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर दाखल झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 16 =